देहूगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकतर्फी विजय
भाजपला अवघ्या एका जागेवर समाधान
देहूगाव : देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने देहू नगरपंचायतीवर निर्विवाद सत्ता मिळवली. 17 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले तर भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले असून दोन अपक्ष निवडून आले आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके व भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देहू गावात प्रचाराचा धुराळा उडविल्याने निवडणूक अंत्यत चुरशीची झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार शेळके यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात मोठी आघाडी घेत विजयांचे संकेत दिले होते. आजच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने मिळविलेल्या या एकतर्फी विजयाचा तालुक्यात सर्वत्र जल्लोष सुरु झाला आहे.
देहू नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांमध्ये एक उत्सुकता होती. एकूण 17 जागांसाठी 60 उमेदवार रिंगणात होते. त्यातून आता राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागांवर विजय मिळविला आहे. तर भाजपाला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला आहे. तर दुसरीकडे अपक्षांनी 2 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे आता देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालची आणि भंडाऱ्याची उधळण करत एकच जल्लोष केला आहे.
(सविस्तर निकाल थोड्याच वेळात)