केंद्रीय मंत्री नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नीचा मृत्यू

0

कर्नाटक : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये नाईक यांच्या पत्नी आणि त्यांचे स्वीय सचिव यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते आहे. तर मंत्री नाईक आणि इतर दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाईक हे यल्लपुराहून गोकर्ण येथे प्रवास करीत होते. त्यावेळी गाडी पलटी झाल्याने ही दुर्घटना घडलेली आहे.

कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करताना श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी पलटल्याचे सांगितले जात आहे.
त्यांच्या पत्नीला या अपघातात गंभीर दुखापत झाली होती व रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. श्रीपाद नाईक यांच्याशिवाय इतर तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र दुर्देवाने यामध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर श्रीपाद नाईक यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहे.

श्रीपाद नाईक यांचे स्वीय सचिव दीपक यांचाही अपघातात मृत्यू झाल्याच समजत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.