पिंपरी : बेकायदेशीरपणे सिमेंटचे पोल, तारेचे कंपाउंड तोडून, जागेवर ताबा मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पहिला नावाचा बोर्ड काढून दुसरा बोर्ड लावला. हा प्रकार 23 फेब्रुवारी रोजी मारुंजी गाव येथे घडला.
भगवान सिंग चित्तोडिया, त्याची पत्नी, भाऊ आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरणप्रकाश बुचडे (38, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या तीन गुंठे जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. फिर्यादीस शिवीगाळ करूनगॅस कटर आणि जेसीबीने जागेला असलेले सिमेंट पोल आणि तारेचे कंपाउंड तोडून नुकसान केले. फिर्यादी यांच्या नावाचा बोर्ड आणिकंपाउंडच्या तारा काढून चोरून नेल्या. तिथे भगवानसिंग चित्तोडिया या नावाचा बोर्ड लावला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडीपोलीस तपास करीत आहेत.