पतीकडून पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

0

पुणे : पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणा-या पतीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. अनैसर्गिक पद्धतीने शरिरसंबंध ठेवले नाही तर आपण दोघे मोठ्या गाडीखाली आत्महत्या करू, अशी धमकी पती पत्नीला देत होता. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेल्या सासरच्यांवर देखील गुन्हा दाखल केला आहे.

फलटण येथे राहणा-या ३० वर्षीय विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचा ३३ वर्षीय पती, नंणंद, सासरे आणि आणखी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ आॅक्टोंबर ते ११ डिसेंबर २०२० दरम्यान हडपसरमधील काळेपडळमध्ये हा प्रकार सुरू होता. आरोपी पतीने मोबार्इलमध्ये अश्‍लिल व्हिडीओ पत्नीला दाखवला. त्यानंतर त्याप्रमाणे जबरदस्ती पत्नीबरोबर तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक आत्याचार केला. त्यास विरोध केला म्हणून पतीने पत्नीला शिवीगाळ देखील केली आहे.

अनैसर्गिक पद्धतीने शरिरसंबंध ठेवले नाही तर आपण दोघे मोठ्या गाडीखाली आत्महत्या करू, अशी धमकी देखील आरोपी पतीने पत्नीला दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान या प्रकरणात अटक करून पतीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील संतोषकुमार पाटाळे यांनी केला. न्यायालयाने आरोपीला १९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास हडपसर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक आर. आर. पाटील करीत आहेत.

पतीवर सुरू आहे मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार :
संबंधित आरोपी पतीवर मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार सुरू आहेत. मात्र पतीवर उपचार सुरू असल्याची बाब सारू-सासरे, नणंद यांनी लपवून ठेवली. तसेच माझा शारिरीक आणि मानसिक छळ केला म्हणून गुन्हा नोंदवत असल्याचे संबंधित विवाहितेच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.