रहाटवडेमध्ये पोलिस बंदोबस्तात सरपंच, उपसरपंच पदाची बिनविरोध निवड

गावाला पोलिस छावणीचे स्वरुप : २४ तास जमावबंदी

0
भोर : रहाटवडे ( ता. हवेली ) येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून सदस्याचे दोन गट पडल्याने सरपंच उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या वादातून गावात गेल्या महिन्यापासून तणावाचे वातावरण राहिले होते. अखेर शुक्रवारी तणावाच्या वातावरणात मोठ्या पोलिस बंदोबस्तात ठरल्याप्रमाणे सरपंच उपसरपंचपदाची बिनविरोध निवड करण्यात आली असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
सरपंचपदी रुपाली दत्तात्रय चोरघे तर उपसरपंचपदी वैशाली बाबाजी चोरघे यांची निवड बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी किशोर शिंगोटे व सहाय्यक ग्रामसेवक विठ्ठल मांढरे यांनी घोषित केले. निवडीसाठी रुपाली दत्तात्रय चोरघे, वैशाली बाबजी चोरघे, अश्वीनी मनोहर चोरघे, विद्या अरविंद दरडिगे, सुनिता महेश चोरघे, चैत्राली धनाजी गोरे, साधना जितेंद्र चोरघे, संतोष बबन कांबळे, ललिता महेंद्र चोरघे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे काका चव्हाण, नवनाथ पारगे, दत्तात्रय चोरघे, उत्तम चोरघे, संतोष चोरघे, सुरेश दरडिगे, बाबाजी चोरघे, अरुण चोरघे, पोपट चोरघे, गजानन चोरघे,ज्ञानोबा चोरघे, राजु पवार आदी ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडु नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात असून गावामध्ये २४ तास जमावबंदी आदेश लागु करण्यात आले आहे.
दरम्यान, रहाटवडे गावामध्ये ग्रामस्थांनी मिळुन सर्व नऊ सदस्यांची बिनविरोध निवड केली होती. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी गावपातळीवरच सरपंच आणि उपसरपंच निवड करण्यात येणार होती. मात्र तत्पुर्वीच निडणून दिलेल्या पाच सदस्यांनी बाहेर पडुन बंडखोरी केली होती. यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता व तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सरपंचपदाची निवडणुकी पुरेसे सदस्य नसल्याने तहकुब करण्यात आली होती ती आज दि. ५ रोजी पार पडली. गाव पातळीवर ठरल्याप्रमाणे सरपंच उपसरपंचांची निवड झाल्याने आता गावामध्ये एकमेकाबाबत कोणताही रोष अथवा वाद नसल्याची माहिती पैलवान दत्तात्रय चोरघे व बाबाजी चोरघे यांनी दिली, तर काका चव्हाण यांनी वादविवाद न करता एकत्र राहुन गावच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ग्रामस्थ व सदस्यांना केले.
गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणुन येथे जमावबंदीचा आदेश लागु करण्यात आला असून सध्या परिस्थितनुसार गावामध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.’
– संदीप घोरपडे, पोलिस निरीक्षक, राजगड पोलिस स्टेशन
Leave A Reply

Your email address will not be published.