शिवसेनेच्या समृद्धी सावंत देगांवच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

0
भोर (माणिक पवार) : देगांव ( ता. भोर ) ग्रामपंचायतीच्या जनसेवा महाविकास आघाडी पॅनेलचे शिवाजी पंढरीनाथ यादव यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली असून विशेष म्हणजे तालुक्यातील सर्वात कमी वयाची सदस्या ठरलेली व शिवसेनेच्या समृद्धी अंकुश सावंत यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सरपंच उपसरपंच यांचे राजकीय पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

देगांव ( ता. भोर ) येथील निवडणुकीत जनसेवा महाविकास आघाडी पॅनेलचे चार उमेदवार विजयी झाले असून शिवाजी पंढरीनाथ यादव, मजूंषा सुशील शेलार, आझम मुलानी विजयी झाले आहे. तर विरोधकांना तीन जागा मिळाल्या होत्या. सरपंच आणि उपसरपंचपदासाठी अनुक्रमे शिवाजी यादव व समृद्धी सावंत यांनी अर्ज भरले होते. त्यांच्या विरोधात अर्ज भरलेल्या संभाजी यादव आणि अश्विनी सावंत यांनी माघार घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सरपंचपदी शिवाजी यादव तर उपसरपंचपदी समृद्धी सावंत यांची बिनविरोध निवड म्हणून घोषित केले. यावेळी माजी सरपंच अशोक शेलार, अंकुश सावंत, सोनू यादव, बबूआण्णा यादव, चंदू मुलाणी, तुळशीराम सावंत, अभिजित शेलार, सोपान मोहिते, स्वनिल सावंत, आदेश यादव, सचिन यादव, अंकुश नाईलकर, आदिनाथ यादव,राहुल फणसे, तुषार सावंत, विशाल कांबळे, अशोक यादव, सुशील शेलार, गणेश रांजणे, सुभाष पवार आदी उपस्थित होते.

शिवसैनिक समृद्धी अंकुश सावंत यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे आदी शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी समृद्धीचे अभिनंदन केले आहे. स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करतानाच अर्थशास्त्र पदवीधर असलेली समृद्धीने उपसरपंच पदाच्या माध्यमातून गावामध्ये महिला सक्षमीकरण करून विकासकामे करणार असून स्पर्धा परीक्षा देऊन एक कर्तव्यदक्ष अधिकारी होणार असल्याची भावना समृद्धीने व्यक्त केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शरद सावंत, तलाठी व्ही. एच. धायगुडे, ग्रामसेवक स्वप्नील आंबेकर यांनी कामकाज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.