सरपंच ते सर्व सदस्यांची लिलाव पध्द्तीने बिनविरोध निवड

वाचा सविस्तर काय आहे प्रकार आणि किती रक्कम मिळाली गावाला

0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील 17 सदस्य असणाऱ्या उमराने गावातील ग्रामस्थांनी भन्नाट आयडिया काढून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करायचे ठरवले आहे. मात्र या आयडिया मुळे गाव संपूर्ण राज्यभर चर्चेत आले आहे. गावकऱ्यांनी सरपंच पद ते सदस्य सर्वांची निवड ही लिलाव पद्धतीने केली. यातून जमा होणारा निधी हा गावच्या मंदिरासाठी दान केला जाणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या वाऱ्यात बिनविरोध केल्यास एवढी रक्कम देऊ असे राजकीय नेते सांगत आहेत. मात्र नाशिकमधील उमराने गावाने तर इच्छुकांना एक अनोखी ऑफर दिली. आम्हाला दारु, मटण किंवा पैसे नकोत. त्याऐवजी ग्रामदेवतेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करा आणि बिनविरोध निवडून या, असा प्रस्ताव गावकऱ्यांनी राजकारण्यांसमोर मांडला.

बिनविरोध निवडणुकीसाठी झालेल्या लिलावात सरपंचपदासह ग्रामपंचायतीमधील विविध पदांसाठी 2 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम निश्चित झाली. लिलावाची ही रक्कम ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर मंदिरासाठी दान करण्यात येणार आहे.

बिनविरोध निवडून येणाऱ्या 17 उमेदवारांनी 2 कोटी 25 लाखांची रक्कम देण्याचे कबूल केले आहे. उमराने ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सर्वाधिक रक्कम देणाऱ्या सदस्याला सरपंचपद मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.