मुंबई ः काॅंग्रेस पक्षाला रामराम ठोकलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात सक्रीय होणार आहेत. सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असे वृत्त इंडिया टुडेने दिलेले आहे.
विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नावांच्या यादीत त्यांच्याही नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काॅंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. मात्र, भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. नंतर त्यांनी काॅंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता.