उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश 

0

मुंबई ः प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ठरल्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेने पक्षात प्रवेश केला आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आज त्यांच्या शिवसेनेतील प्रवासाने त्यांची निवड निश्चित मानली जाते.

विधान परिषदेतील राज्यपालनियुक्ती जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडीच्या सरकारने पाठविले होते. खासदार संयज राऊत यांनी यापूर्वीच उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करतील, असे सांगितले होते. आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी उर्मिला मातोंडकर पोहोचल्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवेसेनेत त्यांनी प्रवेश केला.

उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काॅंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. मात्र, भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. नंतर त्यांनी काॅंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.