पुणे,: शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी अशा एकूण ३०० जणांचे सोमवारी लसीकरण करण्यात आले. पुणे बार असोसिएशनच्या वतीने लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. श्रुती भोसले, आकाश सौदे, अशरफ शेख, लोखंड यांनी लसीकरण केले. महापालिकेने परवानगी दिल्यास दर आठवड्याला, अशी लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त न्यायाधीश, वकील व न्यायालयीन कर्मचारी यांचे लसीकरण करता येर्इल. लसीकरणादरम्यान सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे बार असोसिएशनकडून करण्यात आले आहे. कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांत ३५ हून अधिक वकिलांचा मृत्यू झाला आहे.