आज पासून 30 वर्षा पुढील नागरिकांना लसीकरण

0

मुंबई : कोरोना लसीकरण बाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आज19 जूनपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.