पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे पाच हजार डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आज (शुक्रवारी) फक्त दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे डोस घेणाऱ्यांनीच लसीकरणासाठी येण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे.
महापालिकेला आज कोविशिल्डचे पाच हजार डोस प्राप्त झालेले असून फक्त वय वर्षे 45 वर्षापुढील नागरीकांनी पहिला डोस घेतलेला आहे. त्याच नागरीकांनी दुसरा डोस घेण्यासाठी उद्या (शुक्रवारी) भोसरी- सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, छत्रपती शाहू महाराज शाळा दिघी, संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल इंद्रायणीनगर, पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालय च-होली, प्राथमिक शाळा मोशी
सांगवी- कासारवाडी दवाखाना, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा पिंपळे गुरव, शितोळे शाळा सांगवी, बालाजी लॉन्स सांगवी, गणेश इंग्लिश मिडियम स्कुल दापोडी, तालेरा- तालेरा रुग्णालय, बिजलीनगर दवाखाना, किवळे दवाखाना, गुरुव्दार वाल्हेकरवाडी, मनपा शाळा वाल्हेकरवाडी, मनपा शाळा पुनावळे, सेक्टर 29 रावेत, आकुर्डी- हेगडेवार भवन, संजय काळे, आरटीसीसी, जाधववाडी, चिखली, थेरगांव- मनपा शाळा वाकड, मंगलनगर शाळा, भुमकरवस्ती शाळा, यशवंतराव चव्हाण स्कुल ग प्रभाग, कस्पटेवस्ती शाळा,
वाय.सी.एम.एच- वाय.सी.एम.रुगणालय, नेहरुनगर दवाखाना, जिजामाता रुग्णालय- अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, काळेवाडी पवनानगर शाळा, यमुनानगर- यमुनानगर रुग्णालय, स्केटींग ग्राऊंड सेक्टर २१, प्राथमिक शाळा म्ह्त्रेवस्ती या लसीकरण केंद्रावर प्राधान्याने उपस्थित रहावे.
प्रत्येक लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मर्यादित नागरीक/लाभार्थी यांना लसीकरण करण्यात येणार आहे. नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.