लस संपल्याने उद्या पिंपरी-चिंचवड, मावळ भागात लसीकरण बंद

0

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील लसीकरण केंद्रे उद्या (गुरुवारी) बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. तसेच मावळातील ही केंद्रे बंद असणार आहेत.

महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. महापालिकेची 59 आणि खासगी 28 अशी 87 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. या 87 लसीकरण केंद्रावर शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाते. तथापी, लसीचा साठा उपलब्ध नसल्याने उद्या शुक्रवारी (दि.9) एप्रिल रोजी सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.

महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या 59 लसीकरण केंद्रामार्फत सुमारे 1 लाख 80 हजार 92 व्यक्तींना लस देण्यात आले आहे. तर, खासगी 28 लसीकरण केंद्रामार्फत 50 हजार 777 व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरातील एकुण 2 लाख 30 हजार 869 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.

शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीचा साठा प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. साठा उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण केंद्र नियमीत वेळेत सुरू करण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.