वाल्मिक कराडचा पिंपरी चिंचवडच्या हायफाय सोसायटीत 4 BHK फ्लॅट

0

पिंपरी : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडबाबातअनेक खुलासे समोर येत आहेत. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावे, ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचा आरोपकरण्यात आला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याची माहितीसमोर आली आहे.

पुण्यानंतर वाल्मिक कराडने पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. वाल्मिक बाबुरावकराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावाने हा फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्कआयवरी इमारतीत हा फोर बीएचके फ्लॅट आहे, ज्याची आजच्या बाजार भावानुसार हा फ्लॅट साडे तीन कोटींच्या किमत आहे. सध्याइथं कोणी राहत नसल्याची माहिती आहे, मात्र मिळकत कर थकवल्याप्रकरणी महापालिकेने फ्लॅटच्या बाहेर नोटीस चिटकवली. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच कर भरण्यात आला.

वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने गैरमार्गातून कमावलेला पैसा पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये गुंतवल्याचा समोर आले आहे. यावाल्मिक कराडशी संबंधित असलेल्या ज्योती मंगल जाधव हिच्या नावावरती पुण्यातील एफसी कॉलेजच्या समोर अनेक ठिकाणीमालमत्ता घेतल्याच्या समोर आलं होतं, त्यानंतर आता या वाल्मिक कराडने पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट सोसायटीत एक फ्लॅट खरेदीकेल्याची माहिती उघड झाली आहे. पार्क स्ट्रीट सोसायटीत 601 नंबरचा फ्लॅट वाल्मिक कराडचा असल्याची माहिती आहे. या फ्लॅटच्यादारावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कारवाई करत कर थकल्याने नोटीस लावली. हा फ्लॅट वाल्मिक बाबुराव कराड मंजलीवाल्मिकराव कराड या दोघांच्या नावावरती आहे. मंजली कराड वाल्मिक कराडची पत्नी आहे. या दोघांनी हा फ्लॅट खरेदी केल्याचीमाहिती आहे. आता या ठिकाणी कोणीही राहत नसल्याची माहिती आहे. मात्र वाल्मिक कराड याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत, अशातच त्याची अनेक ठिकाणची मालमत्ता समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.