पुर्वीच्या भांडणातून वाहनांची तोडफोड; 24 तासाच्या आत आरोपी अटक

0

पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आणि दारु पिण्यास पैसे दिले नाहीत याचा राग मनात धरुन, तरुणावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करुन, वाहनांची तोडफोड केली. या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने 24 तासाच्या आत अटक केली आहे. ही घटना काळेवाडी येथील साई वैष्णवी पार्क सोसायटीच्या मोकळ्या जागेत रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

या प्रकरणी हर्षल मारुती दाखले (18, रा.तपकीरनगर, काळेवाडी) याने फिर्याद दिली असून त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. तर कौस्तुब देशमुख, अभय गवळी, निखिल अवचार, अनिकेत शिंदे, तात्या शिंदे आणि सचिन फकाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर अभय गवळी, निखिल अवचार या दोघांना अटक केली आहे.

हर्षल हा मित्रांसोबत गप्पा मारत असताना त्या ठिकाणी कौस्तुभ आला. पूर्वी झालेल्या भांडणातून आणि दारूला पैसे दिले नाही म्हणून चिडून शिवीगाळ केली. तसेच त्याच्या हातातील लोखंडी हत्याराने हर्षल वर हल्ला केला. यावेळी हर्षल याने वार चूकल्याने तो इंडिगो कारच्या मागील काचेवर बसला.

हर्षल हा घरात गेला असता त्याने पुन्हा शिवीगाळ करुन उभा असणाऱ्या दुचाकीची तोडफोड केली. तसेच रस्त्याने जाणाऱ्यांना धमकी देवून दहशत माजवली. याबाबत गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकास माहिती मिळताच, तपास करुन अवघ्या 24 तासात आरोपींना अटक केली.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक मछिंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस नाईक नदाफ, शिंदे, ओंबासे,  जाधव या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.