पिंपरी : वाहन चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना वाकड पोलिसांनी थेरगाव येथून अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्यादहा दिवसाची जप्त करण्यात आल्या आहेत.
कमलेश भागवत परदेशी (22, रा. चिंचवड. मूळ रा. मुपो. लोंढे ता. चाळीसगाव जि. जळगाव), शुभम राजेंद्र निकम (20, रा. चिंचवड. मूळ रा. मुपो. लोंढे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), पुष्पक दिलीप पाटील (23, रा. थेरगाव. मूळ रा. मुपो. लोंढे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), प्रज्वल लालजी भोसले (24, रा. चिंचवड. मूळ रा. मुपो. लोंढे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) अशी अटक केलेल्याआरोपींची नावे आहेत.
पोलीस उपयुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिसांचे पथक थेरगाव परिसरात पेट्रोलिंग करत असतानाथेरगाव येथे दोन दुचाकी संशयित दिसल्या. त्यानुसार पोलिसांनी दुचाकिंचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. दुचाकी वरीलचौघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी चोरीच्या असल्याचे उघडकीस आले. दुचाकी वरील चौघांकडे कसूनचौकशी केली असता त्यांनी वाकड, चिखली, येरवडा, पिंपरी, चिंचवड परिसरातून दहा दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनीआरोपींकडून पाच लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. वसंत परदेशी, पोलीसउप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाडड, पोलीस निरीक्षकरामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्रकाळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संदीप गवारी, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबीले, अतिकशेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडीत यांनी केली.