मुंबई ः मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. मराठी नाटके आणि चित्रपटे व मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली होती.
भारदस्त आवाज, झुपकेदार मिशा आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे न्यायाधीश, पाटील, पोलीस, अशा भूमिका साकारल्या. त्यांनी १५० हून जास्त नाटके आणि २०० हून जास्त मराठी सिनेमे केलेले आहेत. वयाच्या ८२ व्या वर्षांपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकरल्या होत्या. अगबाई सासूबाई ही मालिका त्यांची अखेरची मालिका ठरली.
रवी पटवर्धन यांनी रिजर्व्ह बॅंकेत नोकरी केली होती. सहा वर्षांचे असताना त्यांनी नाट्यमहोत्सावातील बाल्यनाटकात त्यांनी काम केले होते. श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून रुग्णालयात दाखल झाले. मार्च महिन्यात त्यांनी एक हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना मुलगी, जावई आणि चार नातवंडे आहेत.