गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला अटक

0

पिंपरी : गावठी पिस्टल जवळ बाळगल्याप्रकरणी सांगवीतील एकाला अटक करण्यात आली असून रहाटणी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप डेअरी चौकातील पुलाखाली आरोपीला शुक्रवारी (दि.03) ताब्यात घेतले.

मयुर अकबर औचरे (23, रा. पीडब्लूडी कॉलनी, सांगवी) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर शुभम खडसे (रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुस-या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बेकायदेशीरपणे जवळ 40 हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्टल बाळगले होते, तसेच त्याच्या जवळ दोन राऊंड देखील मिळून आले. तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.