विनय कुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारला

0

मुंबई : राज्य पोलिस दलातील तब्बल 30 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या मंगळवारी रात्री उशिरा गृह विभागाने केल्या. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांची बदली झाली. तर अंकुश शिंदे यांची बदली नाशिक पोलीस आयुक्त येथे झाली.

आज बुधवारी सायंकाळी विनय कुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. माजी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून या पदाचा पदभार चौबे यांनी घेतला. यानंतर आयुक्तालयाची माहिती शिंदे यांच्याकडून घेतली.

पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची ओळख करुन चर्चा केली. 

Leave A Reply

Your email address will not be published.