विनायक राऊत म्हणाले,”दिल्लीतल्या भाजपानेच फडणवीसांचा काटा…”

0

चिपळूण ः ”दिल्लीकरांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी नको होते. कारण, त्यांना मी पणाचा गर्व चढला होता. त्यांनी दिल्लीतील नेतृत्वाची स्पप्ने पडत होती. त्यामुळे दिल्लीतल्या लोकांनीच त्यांचा काटा काढला”, असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत केला आहे.

चिपळूण येथील एका पत्रकार परिषदेत बोलत होते. राऊत म्हणाले की, ”राज्यातील देवेंद्र फडणवीस पुरुस्कृत भाजपातील विकृत बुद्धीचे टवाळखोर महाराष्ट्र आणि राज्यसरकारची बदनामी करत आहेत. सत्ता हातातून गेल्यामुळे त्यांचा जळफळात होत आहे”, अशा शब्दात विनायक राऊत यांंनी भाजपावर टीका केली.

”भाजपा आणि संघामध्ये मी पणाची भाषा चालत नाही. त्यांच्या प्रत्येक वाक्यात ‘आम्ही’ शब्द चालतोय फडणवीसांनी सरळ मी पणाची भाषा सुरू केली होती. त्यांनी केंद्रातील नेतृत्वाची स्वप्ने पडली होती. तेच दिल्लीकरांनी रुचले नाही. त्यामुळेचा फडणवीसांचा काटा काढण्यात आला”, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.