लाल किल्ल्यावरील हिंसाचार; दीप सिद्धूला अटक

0
दिल्ली : लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अभिनेता दीप सिद्धूला अटक केली आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्याकडे नेण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.

नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. आंदोलक शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण साहिब धार्मिक ध्वज फडकावला होता. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर अभिनेता दीप सिद्धू याचं नाव समोर आलं होतं.

दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला होता. त्याचबरोबर दीप सिद्धूला अटक करण्याची मागणीही सातत्यानं केली जात होती.

लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध टीकेचा सूर उमटला. मात्र, ध्वज फडकावणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबी गायक दीप सिद्धूने भडकावल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. राजकीय पक्षांकडूनही दीप सिद्धूला अटक करण्याची मागणी सातत्यानं केली जात होती.

Delhi Police have arrested Deep Sidhu, an accused in 26th January violence case.

(Picture taken after arrest; source: Delhi Police) pic.twitter.com/RBLYbrGfik

— ANI (@ANI) February 9, 2021

Leave A Reply

Your email address will not be published.