“अ सोशल-लीगल अॅनालिसिस ऑफ प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट, 2012” या विषयावर आभासी पुस्तक प्रकाशन आणि चर्चासत्र
पुणे : सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सिम्बायोसिस विधी महाविद्यालय , पुणे येथे डिकोडिंग चाइल्ड सेक्शुअलअब्यूज: प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट, 2012 या विषयावर आभासी पुस्तक प्रकाशन आणि चर्चा 22 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता आयोजित केली होती. डॉ. शालिनी फणसाळकर जोशी, माजी न्यायाधीश, मुंबई उच्चन्यायालय आणि सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे येथील विद्वान व्हीसीटींग प्राध्यापक यांनी हे पुस्तक लिहिले आहे. सदर कार्यक्रमओकब्रिज प्रकाशन च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक, न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते , डॉ. एस.बी. मुजुमदार, माननीयकुलपती, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ , संस्थापक आणि अध्यक्ष, सिम्बायोसिस या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तसेच, डॉ. रजनी गुप्ते, कुलगुरू, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ उपस्थित होते.
मा. न्यायमूर्ती धीरूभाई नारनभाई पटेल, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, मा. न्यायमूर्ती मोहित शहा, मुंबई उच्च न्यायालयाचेमाजी मुख्य न्यायाधीश (निवृत्त), मा. न्यायमूर्ती रोशन दळवी (निवृत्त), न्या मा. यमूर्ती मृदुला भाटकर (निवृत्त), न्यायमूर्ती वासंती नाईक(निवृत्त), न्यायमूर्ती विभा कंकणवाडी, मा. न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्या. रेवती मोहिते– डेरे , मा. न्यायमूर्ती श्रीराम, मुंबई उच्चन्यायालयाचे मा. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि मा. न्यायमूर्ती सोनिया गोकाणी , गुजरात उच्च न्यायालय इत्यादी कायदा क्षेत्रातीलदिग्ग्ज मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. डॉ. शशिकला गुरपूर, फुलब्राइट स्कॉलर, संचालक, सिम्बायोसिस विधी महाविद्यालय पुणे, अधिष्ठाता, विधी विद्याशाखा, (एस. आय. यु ), जीन मोने चेअर प्रोफेसर इ. यु. क्लायमेट जस्टिस लॉ, गव्हर्नन्स, मॅनेजमेंट आणिपॉलिसी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि माननीयांचे अभिनंदन केले. न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी यांनी एका समर्पकविषयावर पुस्तक लिहिल्याबद्दल डॉ. गुरपूर यांनी नमूद केले की हे पुस्तक कायदेमंडळ आणि आणि अंमलबजावणी अधिकाऱ्यांसाठीएक हँडबुक बनेल असा विश्वास व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषण डॉ. एस.बी. मुजुमदार यांनी केले. पुस्तक प्रकाशनाबद्दल माननीय न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसाळकर जोशी यांचेअभिनंदन केले. त्यांनी व्यावहारिक आधारित शिक्षण सुरू ठेवण्यावर भर दिला कारण यामुळे विद्यार्थ्यांचा अनुभव समृद्ध होतो आणित्यासाठी डॉ. न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी यांसारख्या तज्ञांना श्रेय दिले.
डॉ. न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी यांनी बाल लैंगिक शोषण हे कुटुंब आणि समाजाचे सर्वात जवळचे रहस्य आहे असा उल्लेखकरत त्यांच्या पुस्तकाचा आणि त्यातील विषयांचा परिचय करून दिला. जनजागृती करणे आणि बाल अत्याचार रोखण्यासाठीउपाययोजना सुचवणे हे पुस्तकाचे उद्दिष्ट आहे असे स्पष्ट केले. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्याकडून मिळालेल्या असीम समर्थनाची कबुली दिली. तसेच डॉ. एस.बी. मुजुमदार, ओक ब्रिज पब्लिशिंग हाऊस ज्यांनीवैयक्तिकरित्या तिच्याशी संवाद साधला आणि तिला पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरित केले या सर्वाकडून पाठिंबा मिळाल्याचे समाधानव्यक्त केले. ज्या बालकांनी लैंगिक अत्याचाराचे अनुभव सांगितले आणि पुस्तक लिहिणेस प्रवृत्त केले त्यांना हे पुस्तक समर्पित करतआहे असेही त्यांनी नमूद केले.
या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक, डॉ. एस.बी. मुजुमदार , डॉ.रजनी गुप्ते, डॉ.शशिकला गुरपूर, न्यायमूर्ती डॉ.शालिनी फणसळकर जोशी व इतर मान्यवर. प्रमुख पाहुणे, यांच्या उपस्थितीत करण्यात आले. माननीय न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओका यांनी आपले प्रमुख भाषण केले. त्यांनी डॉ. न्यायमूर्तीजोशी यांच्यासोबतच्या त्यांच्या व्यावसायिक सहकार्याची आठवण करून दिली आणि पुस्तक प्रकाशनाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. न्यायमूर्ती ओक यांनी विशद केले की अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे लहान मुले अनभिज्ञतेमुळे लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. पुस्तकात चर्चा केलेल्या मुद्द्यांवर प्रकाश टाकताना, न्यायमूर्ती ओक यांनी न्यायालयीन पायाभूत सुविधांमधील उणीवा, पोलिसकर्मचार्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव आणि बाल अत्याचाराशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी प्रशिक्षित आणि विशेष वकिलांचीअनुपस्थिती यावर प्रकाश टाकला. शेवटी, न्यायमूर्ती ओक यांनी POCSO कायद्याच्या तरतुदींचे वैज्ञानिक लेखापरीक्षण करण्याचीआवश्यकता असल्याचे सांगितले, ज्याची विधीमंडळाने दखल घेणे आवश्यक आहे.
डॉ.शशिकला गुरपूर यांनी पुस्तकाचे प्रास्ताविक केले. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा उल्लेख केला आणि यासमस्येवर अनोखे उपाय शोधल्याबद्दल लेखिकेचे कौतुक केले. , डॉ. गुरपूर यांनी पुस्तकाच्या आणि ते लिहिण्याचा प्रवास यासंबंधीच्यासमर्पक प्रश्नांवर लेखकाशी संवाद साधला. पुढे डॉ. गुरपूर आणि डॉ. न्यायमूर्ती जोशी यांनी पुस्तकामागील प्रेरणा, आंतर–विद्याशाखीयदृष्टिकोनाची गरज आणि बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी समाजाची भूमिका यावर चर्चा केली. शेवटी डॉ. गुरपूर यांनी पुस्तकचर्चेचा समारोप केला आणि त्याच्या व्यापक प्रसारासाठी शुभेच्छा दिल्या. देशभरात बाल शोषणाबाबत जागरूकता निर्माणकरण्यासाठी या पुस्तकाचे इतर स्थानिक भाषांमध्ये भाषांतर केले जावे, असेही नमूद केले.
पुस्तकावरील चर्चेनंतर प्रश्नोत्तर सत्राचे सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक लास्स्या व्याकरणम यांनी केले. डॉ.शालिनी फणसाळकर जोशीयांनी प्रश्नांना उत्तरे दिली. ओकब्रिज पब्लिशिंग प्रा.लि.चे संचालक श्री.श्रीश चंद्र यांनी आभार प्रदर्शन करताना कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.