नवी दिल्ली ः थोडासा मागे पडलेल्या परंतु चाहत्यांच्या मनात घर करून राहिलेला बाॅलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेराॅयचा दानशूर स्वभाव पुन्हा लोकांसमोर आलेला आहे. तो एकीकडे चित्रपटांमध्ये कम करतो आणि दुसरीकडे देशाच्या विकासकामांमध्येदेखील आपले योगदान देत आहे. त्याने नुकतेच ‘एकल फाउंडेशन’चा ब्रॅण्ड अम्बेसीटर होत ५० करोड फंड गोळा केला आहे. विवेक म्हणतो की, यामुळे देशातील सुमारे एक लाख शाळांना या फंडचा फायदा होणार आहे.
एकल फाउंडेशन एक अमेरिकेतील संस्था आहे, त्याचा प्रतिनिधी विवेक आहे. सहा वर्षांपासून विवेक या संस्थेला जोडून आहे. तो दर वर्षी या संस्थेच्या माध्यमातून फंड गोळा करत असतो. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील मागासलेल्या भागातील १ लाख शाळा जोडलेल्या आहेत. यंदा ५० करोड फंड या १ लाख शाळांना समान वाटला जाणार आहे. त्यातून २७ लाख विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि निरोगी आरोग्य मिळणार आहे.
विवेक ओबेराॅयने करोना काळात ऑनलाइन वरील रक्कम गोळी केली आहे. विवेकचा सद्याचा चित्रपटप्रवास पाहायचा झाला तर, पीएम नरेंद्र मोदी नावाच्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत होता. कन्नड भाषेतील ‘रुस्तम’ चित्रपटातदेखील दिसला आणि हाॅरर फिल्म ‘रोजी-द सैफ्रन चॅप्टर’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.