पुणे : पुण्यातील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अॅथलिट्सच्या ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या आणण्यावरुन वादंग पेटला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या क्रीडा आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची गाडी तिथे पार्क करण्यास परवानगी देण्यात आली होती, असं उत्तर ओम प्रकाश बकोरिया यांनी दिलं आहे.
“सिमेंट ट्रॅकवर गाड्या पार्क करण्याची परवानगी देण्याचं कारण म्हणजे पवार साहेबांच्या पायाचा काहीतरी प्रॉब्लेम होता. त्यांना चालायला त्रास होऊ नये, म्हणून संमती देण्यात आली होती.” असं स्पष्टीकरण महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिलं आहे.
दुर्दैवाने गाड्या रेसिंग ट्रॅकवर उभ्या केल्या गेल्या. त्याबद्दल आपण माफी मागतो. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असं आश्वासनही बकोरिया बोलताना दिलं.