खूनप्रकरणी हॉटेलमालकासह वेटर अटकेत

0
पुणे : मोबाईल चोरल्याच्या रागातून तरुणास मारहाण करीत त्याचा खून केल्या प्रकरणात हॉटेल मालकासह वेटरला हडपसर पोलिसांनी अटक केली.

दादा ऊर्फ अनिल अंकुश मोरे (वय ३५, रा. मांजरी ब्रुद्रुक, मुळ रा. सोलापुर) आणि बाबूराव रघुनाथ जाधव (वय २९, रा. हडपसर) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत सुरेश दिप्लु राठोड (वय २८, रा. मांजरी ब्रुद्रुक. मुळ रा. कर्नाटक) यांनी फिर्याद दिली. रवी दिप्लु राठोड (वय ३३, रा. मांजरी बुद्रूक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ११ मार्च रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास हडपसर परिसरात ही घटना घडली. दादा मोरे यांचे हडपसर परिसरात शिवशाही नावाचे हॉटेल आहे. त्यात जाधव हा वेटर म्हणून काम करतो.

मोरे यांचा मोबाईल चोरून नेला असल्याच्या रागातून आरोपींनी रवी याच्या पोटामध्ये, पाठीवर व अंगावर जोरात लाथा बुक्यांनी मारहाण करून जबर जखमी केले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.