वाकड पोलिसांनी पकडला ४५० ग्रॅम गांजा

0

पिंपरी : आमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना ताब्यात घेऊन वाकड पोलिसांनी ४५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई कस्पटे वस्ती वाकड येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली आहे.

सचिन दाजी नाचनकर (३९, रा. गणेशनगर, पिंपळे निलख) आणि राजेशकुमार राजकुमार शिंदे (३२, रा. थेरगाव) या दोघांना अटक केली आहे. तसेच त्याच्याकडील दुचाकी जप्त करण्यात आलेली आहे. कस्पटे वस्ती वाकड येथे आमली पदार्थ घेऊन दोघे येणार असल्याची माहिती मिळाली.

वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष पाटील, विरेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, अंमलदार मधुकर कोळी, सूरज सुतार, नितीन ढोरजे, जावेद पठाण, शाम बाबा, विक्रम कुदळ आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्या गाडीच्या डिकीत ४५० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी दोघाना अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.