‘नवधारा’ राज्यस्तरीय स्पर्धेत सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक
स्टार्टअप सुरु करुन आत्मनिर्भर व्हा.....डॉ. आदित्य अभ्यंकर
पिंपरी : भारत देश आर्थिक महासत्ता होण्यासाठी आणखी वेगाने आणि नियोजनबद्द पध्दतीने देशात रोजगारांची निर्मिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वयंरोजगार किंवा स्टार्टअप सुरु करुन आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथिल पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे ‘नवधारा’ या राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी डॉ. अभ्यंकर बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, केपीआयटी कंपनीचे सचिन वाणी, प्रा. तुषार गायकवाड, प्रा. मनिषा देशपांडे, प्रा. प्रिया ओघे, विद्यार्थी प्रतिनिधी आयुष केदारी, निरज कुलकर्णी, रितीका भोईटे आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये राज्यातील पंचवीस अभियांत्रिकी महाविद्यालयातील 75 संघांनी चार विभागात सहभाग घेतला होता.
यावेळी डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नाविन्य आणि नवकल्पनांचा ध्यास घेऊन संशोधन केले, तर आपण निश्चितच ध्येय गाठू शकतो. आपले संशोधन हे दुरगामी टिकणारे परंतू सर्वसामान्यांना परवडणारे देखिल असणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेचे परिक्षक म्हणून अभिजीत देवगिरीकर, केपीआयटीचे सुमेध विप्रादास, झेनस्टेकचे अतुल मोकळ, केपीआयटीचे प्रशांत शेलार, अवया टेक्नोलॉजीसचे विनायक सामक, क्वांटीफायचे शेहजाद खान तसेच पीसीसीओईआरचे प्रा. दिपक बिरादार यांनी काम पाहिले.
विभागानुसार स्पर्धेतील विजेत्या मुलांची नावे पुढीलप्रमाणे :
कॅप्युटर विभाग – प्रथम क्रमांक – सुदेश रामपुरकर आणि ग्रुप (वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली), व्दितीय क्रमांक – आदित्य पाटील (पीसीसीओईआर रावेत), तृतीय क्रमांक – अविष्कार पाटील आणि ग्रुप (आय स्केअर आयटी हिंजवडी), चतृर्थ क्रमांक – नेहा भेगडे (पीसीसीओई आकुर्डी) ;
इएनटीसी विभाग – प्रथम क्रमांक – वैष्णवी भुजबळ आणि ग्रुप (पीसीसीओईआर रावेत), व्दितीय क्रमांक – मिनाक्षी रघुपाद्याय आणि ग्रुप (पीसीसीओईआर रावेत), तृतीय क्रमांक – हर्षल आणि ग्रुप (जेएसपीएम ताथवडे) ;
मेकॅनिकल विभाग – प्रथम क्रमांक – ओम उंब्रे आणि ग्रुप (पीसीसीओईआर रावेत), व्दितीय क्रमांक – श्रेयश माने आणि ग्रुप (पीसीसीओईआर रावेत) ;
सिविल विभाग – प्रथम क्रमांक – श्रेयश खरात आणि ग्रुप (पीसीसीओईआर रावेत), व्दितीय क्रमांक – उम दम फरा आणि ग्रुप (पीसीसीओईआर रावेत) आदी विजेत्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
स्वागत आर्या पानसे, सूत्र संचालन कविता बालीवाडा आभार वैष्णवी भुजबळ यांनी मानले.