आपल्या रोजच्या लिंबुंचे दोन थेंब आरोग्यासाठी उत्तम असतात. पचनासाठी आणि उन्हाळ्यात गरम शरीर थंड ठेवण्यासाठी लिंबू फारच उपयुक्त असतो. आपलं वजन करण्याऱ्या घटकांमध्ये लिंबूचा समावेश होतो. लिंबूत सी विटॅमीन असते. हे विटॅमीन आपले कोलेस्टेराॅल कमी करते. आणि आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीदेखील कमी करते, असे अनेक फायदे लिंबूचे असतात. ते फायदे कोणते ते पाहूया…
लिंबू पाणी ः उन्हाळ्यात लिंबूपाणी आपले संपूर्ण शरीराचे आरोग्य उत्तम राहते. लिंबू तुमच्या शरीराला डिटाॅक्स करत नाही तर, लिंबूमधील एंटीऑक्सिडेन्ट पचनक्रियेतील विकार दूर करते. त्वचेसाठी आणि पचनासाठी कोमट पाण्यात लिंबू पिळून सकाळचे प्यायले तर, भरपूर फायदा मिळतो.
लिंबू चहा ः लिंबाचा चहा आपले वजन घटविण्यासाठी उपयोगी ठरते. एका कपाच्या चहामध्ये २-३ थेंब लिंबाचे थेंब टाकले की, तुमचे शरीरातील कोलेस्टेराॅलवर परिणाम करते.
सलाडमध्ये लिंबाची रस ः तुमच्या सलाडच्या डिशमध्ये लिंबाचा रस पिळा, म्हणजे सलाड टेस्टी लागेलच, त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी उपयोगीदेखील पडेल.
शिजलेल्या भाजीत लिंबाचा रस ः रोजच्या आहारातील भाज्या पोषक तत्वाने भरलेल्या असतात. त्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस पिळला तर, एक रुचकर टेस्ट येते. तसेच लिंबू पिळलेल्या भाज्या खाल्यामुळे वजन घटतेच त्याचबरोबर तुमचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी फायद्याचे ठरते.
लिंबू चिकन ः लिंबाचा रसाचा उपयोग मासांहर शिजविण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचा उपयोग मांस नरम राहण्यास मदत होते. चिकनची रेसिपी टेस्टी राहण्यासाठी लिबांचा रस केला जातो.
वजन वाढणं आणि लठ्ठपणामुळे खूप जण त्रस्त आहे. ते आपलं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला यश येताना दिसत नाही. कारण, योग्य मार्गदर्शन नसणं, खाण्या-पिण्यावर नियंत्रण नसणं आणि व्यायाम न करणं, या गोष्टींमुळे वजन वाढण्याच्या अडचणी निर्माण होतात. मात्र, घरात असणार लिंबू हादेखील आपलं वजन कमी करण्यासाठी खूप मोठा हातभार लावतो. कारण, या लिंबुचे अनेक फायदे आहेत.
-राधिका पार्थ