दाऊद पेक्षा मोठं बनायचे होते, पण…

0

मुंबई : एनसीबीच्या पथकाने दाऊद पेक्षा मोठं बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईतील एका ड्रग्ज माफियाला बेड्या ठोकल्या आहेत. इब्राहिम मुजावर असं त्याचं नाव आहे.

इब्राहिम मुजावर हा दाऊद इब्राहिमला त्याचा आदर्श मानायचा. दाऊदपेक्षा मोठा भाई बनायचं, याचं त्याला वेड होतं. त्यामुळेच दाऊदच्या वडिलांचं इब्राहिम हे नाव घेऊन तो अंडरवर्ल्डमध्ये आला. ड्रग्जची तस्करी करता करता उच्चभ्रूंमध्ये ओळखी त्याने वाढवल्या.

तो उच्चभ्रू वस्तीत हाय प्रोफाइल ग्राहकांना टार्गेट करत असे. स्वतःचं स्टेटस जपण्यासाठी तो ड्रग्ज पुरवण्यासाठी मर्सिडीज कार वापरत असे. हायप्रोफाईल व्यक्तींमध्ये आपली ऊठबस वाढेल आणि बॉलीवूडमध्येही आपला दबदबा निर्माण करण्याचं त्याचं स्वप्न होत. लोखंडवाला परिसरात 10 लाख रुपये किंमतीच्या 100 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रगसह NCBनं त्याला रंगेहाथ अटक केली आहे. इब्राहिम आलिशान मर्सिडीज कारमधून मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना ड्रग्जचा पुरवठा करत असे.

Leave A Reply

Your email address will not be published.