आम्हाला शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मान्य; आयोध्याला जाण्यात काही गैर नाही : नाना पटोले

0

मुंबई : अयोध्येला जाण्यात काही गैर नाही,असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. तर आम्हाला शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मान्य आहे, ते सर्वसमावेशक असल्याचे नाना पटोलेंनी म्हटले आहे. काँग्रेस महाराष्ट्रभरात सभा घेण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर केले. तर राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

महाविकास आघाडीच्या सभा राज्यभरात होत असल्या तरी काँग्रेसच्या स्वतंत्र सभा होणार आहे. त्याची सुरूवात नागपुरातून होईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली.

देशभरात काँग्रेसच्या 6 सभा होणार आहे. राहुल गांधी, प्रियांका वढेरा आणि खरगे यांची उपस्थिती राहाणार आहे. याबाबत 10 तारखेला ठाण्यात मिटिंग घेण्यात येणार आहे. नागपुरातील पहिली सभा या महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. नंतर कर्नाटक निवडणुकीनंतर घेणार असून सहयोगी पक्षांच्या नेत्यांना देखील निमंत्रण राहिल असे पटोले यांनी सांगितले. नागपूरची महाविकास आघाडीची सभा होत असलेल्या मैदानाचाच विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.

ठाणे जिल्ह्यातून सुरूवात होणाऱ्या काँग्रेसच्या सत्याग्रह यात्रेत सावरकरांचे छायाचित्र राहाणार आहे असे काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले होते. मात्र या निमित्त काढण्यात येणाऱ्या यात्रेत सावरकरांचे छायाचित्र लावण्याचा प्रश्नच येत नाही. या संदर्भात चव्हाण यांच्याशी कालच बोलणे झाले. मात्र त्यांनी यात्रेत सावरकरांचे छायाचित्र राहणार नाही, असे सांगितल्याचे पटोले म्हणाले. राम आपले दैवत आहे. मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे. आम्ही देखील रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी केली. अयोध्येला जाण्यात काही गैर नाही असे पटोले यांनी सांगितले. आम्हाला शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मान्य आहे. त्यांचे सर्वसमावेशक होते.

शिस्तपलन समितीची बैठक झाली आहे. आशिष देशमुखांचेही म्हणणे ऐकून घेणे महत्वाचे आहे. आमच्या पक्षात हिटलर शाही नाही असे ते म्हणाले. राज्यातील सरकार बिनडोक्याने काम करीत आहे. सरकार स्वतःसाठी जगत आहे. शेतकाऱ्यांना द्यायला पैसे नसताना1 हजार कोटींच्या जाहिराती दिल्या आहे. जनतेचे काही देणे घेणे नाही. पुणे पोट निवडणूकीत अजून कुठल्याही पक्षाकडून उमेदवार जाहीर केला नाही. अखेर भाजप पुण्यात निवडणूक लावेल की नाही याबाबतच शंका आहे असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.