आम्ही संयमानी घेतोय, याचा अर्थ पोलीस यंत्रणा शांत नाही : संजय पांडेय
येत्या चार-पाच दिवसात पर्यटकांवर फरक दिसेल
पिंपरी : कोरोना नियम शिथिल केल्यानंतर आणि पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश देऊनही
लोणावळ्यासह इतर पर्यटन स्थळांवर नागरिकांनी गर्दी केली. यासंदर्भात बोलताना पोलिसांनी संयम राखला आहे. त्याचा अर्थ पोलीस शांत आहेत असा नाही. पोलिसांनी दांडुका उगारला तर लगेच आपणच आरडा-ओरडा कराल. मात्र कोरोनाची येणारी तिसरी लाट आणि नियमांचे पालन न करणारे पर्यटक यामुळे यापुढे ठोस कारवाई करावी लागणार आहे. येत्या चार-पाच दिवसात फरक दिसेल
असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडेय यांनी दिला आहे.
संजय पांडेय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात समिती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर डीजीपी संजय पांडेय यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोणावळा येथे पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. संचारबंदी, जमावबंदी तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करुन काही पर्यटक गर्दी करत आहेत. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तरी देखील पर्यटक नियमांचे उल्लंघन करित आहेत. पोलिसांनी संयम राखला आहे. त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये. अन्यथा पोलिसांना त्यांचे हत्यार बाहेर काढावे लागेल. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे, संजय पांडेय यांनी यावेळी सांगितले.