‘‘आम्ही मार्ग चालू जिजाऊ अन् सईच्या सुताचे..’’ : आमदार लांडगेंचा वाढदिनी पहिला मुजरा धर्मवीर संभाजी राजांना!
वढू बु. येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळास अभिषेक
पिंपरी : स्वराज्यचे दुसरे छत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलीदान स्थळी पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सपत्नीक अभिषेक केला. आज (दि.२७) वाढदिवसानिमित्त पहिला मुजरा आणि अभिवादन माझ्या राजांना…या भावना यानिमित्ताने लांडगे दांम्पत्याने व्यक्त केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस शहरात विविध उपक्रम, कार्यक्रमांनी दणक्यात साजरा केला जात आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी लांडगे सौभाग्यवती पूजा लांडगे यांच्या सोबत वढू बु. येथे छत्रपती संभाजी महाराज समधीस्थळाकडे रवाना झाले. तत्पूर्वी, आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात प्रार्थना करण्यात आली. यावेळी माजी महापौर नितीन काळजे यांच्यास शिव-शंभूप्रेमी उपस्थित होते.
वढू बु. आणि तुळापूर येथील ग्रामस्थांनी आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभजी महाराज बलीदान स्थळी अभिषक करण्याचे आयोजन केले होते.
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा आणि शंभूसृष्टीचे काम आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झाले आहे.
त्यामुळे शिव-शंभूप्रेमींमध्ये लांडगे यांच्याबाबत कमालींची आपुलकी निर्माण झाली असून, ‘‘जगू पांग फेडावया धर्मभूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ अन् सईच्या सुताचे…’’, अशा भावनेतून आमदार लांडगे कार्यरत आहेत, अशा भावना माजी महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केल्या आहेत.