आम्ही ५० थर लावून राजकीय हंडी फोडली : शिंदे

0

मुंबई : गोविंदा थर लावून दहीहंडी फोडतात, मात्र आम्ही देखील ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून हे थर यापुढे असेच वाढत जातील असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी केली, स्टेजवर येताच यावेळचा गोविंदा जोरात आहे ना ? अशी साद त्यांनी उपस्थित गोविंदांना घातली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘गोविंदाचा विमा पण दिला, प्रताप सरनाईक आणि लोकप्रतिनिधींनी खेळाच्या दर्जाची मागणी केली होती ती मान्य केली असून यापुढचे उत्सव जोरात साजरे करा, पण काळजी घेऊन करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.