‘आमचा कोणावरही आरोप नाही; जे काही घडले तो सर्व पॉलिटिकल ड्रामा होता’

शिवसेना नेते संजय राठोड यांना 'क्लिन चिट'

0
पुणे : राज्यभरात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांसमोर तिच्या आईवडिलांनी जबाब दिल आहे. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना क्लिन चिट मिळाल्याचे बोलले जात आहे.
‘आमचा कोणावरही आरोप नाही, तिच्या मृत्यूनंतर या विषयाला राजकीय वळण दिले गेले. त्यानंतर जे काही घडले तो सर्व पॉलिटिकल ड्रामा होता’, असा जबाब त्यांनी वानवडी पोलिसांकडे दिला आहे, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे.
मूळ यवतमाळ येथील असलेली पूजा चव्हाण (वय 22) या तरुणीने सात फेब्रुवारीला पुण्यातल्या महंमदवाडी येथे इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांनतर या आत्महत्या प्रकरणाला वेगळे लागले. मंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप झाला. त्यांनतर विरोधी पक्षांनी जोरदार प्रकरण उचलून धरले. राज्यभर हे प्रकरण गाजले होते. त्यामुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.
पूजाने आत्महत्या केल्यानंतर काही दिवसांनी वानवडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. त्या अंतर्गत वानवडी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाणच्या आई वडिलांचा जबाब
नोंदवून घेतला आहे. याबाबत वानवडी पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे. तिच्या आई वडिलांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवला. त्यात त्यांनी पूजाच्या आत्महत्येस कोणालाहीजबाबदार धरलेले नाही.
Leave A Reply

Your email address will not be published.