येरवडा कारागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ : वळसे-पाटील

0

पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागाच्या जुन्या इमारतीत असलेले मुख्यालय येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडे असणाऱ्या जागेवर नवीन कारागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन पाहणी करून गृहमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते पाटील बोलत होते. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, अधीक्षक यु. टी. पवार उपस्थित होते.

कोरोनाच्या काळात न्यायालयीन प्रकरणे जलदगतीने निपटारा होण्यासाठी कैद्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करावे, जेणेकरून शासनाचा बंदी न्यायालयात ने- आण करण्याचा खर्च आणि मनुष्यबळ वाचेल, असेही ते म्हणाले.

यावेळी गृहमंत्री श्री वळसे पाटील यांच्या हस्ते 2019-20सांख्यिकी पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. वळसे पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

यावेळी कारागृहात कोरोनाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.