‘आम्ही आणखी खोलात जावू’

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा

0

मुंबई : बलात्कार करायचे, आपलं ऐकलं नाही तर ठार मारायचे. कोणी केली काय केले? मला काही जुन्या घटनांचा इतिहास आठवतो. त्याला काही गुन्ह्यांचे, हत्यांचे आरोपी नाहीत सापडतं. आता मला सांगा रमेश मोरेची हत्या कोणी केली? का केली? त्याची कोणाशी दुष्मनीच नव्हती. जयंत यादवची हत्या का झाली? माहित नाही का आम्हाला? कोणी समजू नये, आम्ही आणखी खोलात जावू, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

राणे पुढे म्हणाले त्यावेळी कोणत्या मंत्र्यांची गाडी होती? त्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज गायब कसे झाले. १३ जूनच्या रात्री सीसीटीव्ही कॅमेरे होते. लोक सांगतात इमारतीमधील. ठराविक माणसाची अॅम्बूलन्स कशी आली? कोणी आणले? त्याला हॉस्पिटलमध्ये कोणी नेले? सगळे पुरावे नष्ट कोणी केले, याची चौकशी होणार. यात कोणते अधिकारी होते हे समोर येणार.

तसेच दिशा सॅलियनचा पोस्ट मार्टम रिपोर्ट अद्याप का आला नाही? ती ज्या इमारतीत राहायची त्या दिवशी ८ जूनचे रजिस्टर कोणी फाडले? कोणाला इंटरेस्ट होता? त्यानंतर दिशा सॅलियन बद्दल सुशांतसिंग बद्दल कळालं त्यावेळी तो म्हणाला मी यांना सोडणार नाही. त्यावेळी काही लोक सुशांतसिंगच्या घरी गेले. त्यांच्यात दिशा सॅलियनवरुन बाचाबाची झाली आणि त्यातच त्याची हत्या झाली, असा गौप्यस्फोटही राणे यांनी केला.

यानंतर त्यांनी दिशा सॅलियन प्रकरणाला सुरुवात केली. ते म्हणाले तिची बलात्कार करुन हत्या झाली आणि सांगितले आत्महत्या केली. का करेल ती आत्महत्या? एक तर ती पार्टीला जात नव्हती. तिचा तो मित्र रोहण राय. त्यानंतर तिला थांबायला सांगितले, पण ती थांबली नाही. घरी निघाली. त्यानंतर कोण कोण होते. पोलिस संरक्षण कोणाला होते. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर पोलिस कोणाचं संरक्षण करत होते?

उद्धव ठाकरेंनी मातोश्री पार्ट एक दुरुस्त केली. मातोश्री पार्ट २ युतीची सत्ता असताना पैसे भरुन बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर केली. त्यांच्या दोन्ही इमारतींचे प्लॅन माझ्याकडे आहेत. पण मी कधीही हे प्रेसला सांगितले नाही. प्रदिप भालेकर यांनी केलेले ट्विट राणे यांनी यावेळी वाचून दाखवले आणि सिंधुदुर्गातील काही लोकांनी राजकीय सुडबुद्धीने आरोपांची सुरुवात केली.

इथे अन्य कोणताही उद्योग चालू नाही. अशा वेळी महापालिका आपल्याकडे आहे. त्यामुळे सातत्याने तक्रारी करणं सुरु आहे. पण सगळे प्लॅन बघायचे आणि सांगायचे सगळं ओके आहे. माननीय बाळासाहेब यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. मात्र आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आली आहे.

मला अनेक जणांचे फोन आले, घराला नोटीस आली आहे. बोलायचाय म्हणून पत्रकारांचे फोन आले. म्हणून मी वास्तव सांगण्यासाठी इथे आलोय. या घरात मी १७ सप्टेंबर २००९ साली आलो आहे. जवळपास १३ ते १४ वर्ष झाले. या इमारतीचे आर्किटेक्ट आज तलाठी आहेत. देशात, जगात त्यांचे नाव आहे. १९९१ च्या नियमांप्रमाणे हे बांधकाम झाले. एकही गोष्ट अपूर्ण न ठेवता मी हे काम केले आहे. त्यानंतर एक इंचही बांधकाम केलेले नाही. आमच्या कुटुंबियांसह एकूण ८ जण इथे राहतो.

Leave A Reply

Your email address will not be published.