पुणे : सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अनिल अवचट ह्यांचे दीर्घ आजाराने पुणेपत्रकारनगर येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचेयोगदान दिले.
आज सकाळी सुमारे 9.15 वाजता त्याचे निधन झाले. त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्तीकेंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्र परिवार आहे.
डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील, असा दिलासामुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना दिला.