नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पश्चिम बंगालला सर्वसाधारण विजेतेपद

0

पुणे :  अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडासंकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथे ९ ते ११ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग स्पर्धेत पश्चिम बंगालने 32 सुवर्ण पदकांसह 90 पदके जिंकत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.  केरळने 17 सुवर्णपदकांसह 44 पदके मिळवत दुसरे स्थान मिळवले तर तेलगंणाने 16 सुवर्ण पदकांसह 34 पदके मिळवत तिसरे स्थान पटकावले. तर महाराष्ट्राला 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि एका कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (USFI) द्वारे आयोजित दुसऱ्या नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप पुणे 2022  स्पर्धेचा समारोप रविवारी झाला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. तपन कुमार पानिग्रही, रोल बाॅल राज्य संघटनेचे अध्यक्ष संदिप खर्डेकर, अभिषेक लोणकर, अचिंता पंडित (कोषाध्यक्ष USFI),रियर एडमिरल पीडी शर्मा (अध्यक्ष RLSS (I),साईश्री हॉस्पिटलचे डॉ. नीरज आडकर आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, फिनस्विमिंग खेळ ज्या उद्देशाने खेळला जातो त्याप्रमाणे या खेळाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, अधिकाधिक खेळाडूंनी फिनस्विमिंग हा खेळ खेळला पाहिजे, यासाठी आगामी काळात पुणे येथे आयोजित होणाऱ्या स्पर्धेला सहकार्य करेल, पाटील म्हणाले, रोलबॉलची  सुरुवात पुणे येथून झाली असून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शासकीय खात्यात नोकरी तसेच इयत्ता १० व १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या खेळाडूंला २५ गुण देण्यात येते. राज्यात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

या स्पर्धेत ३४ राज्य, केंद्रशासित प्रदेशातून ३०० पेक्षा जास्त जिल्ह्यातील १ हजार पेक्षा जास्त खेळाडू आणि प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी सहभाग घेतला आहे. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, कांस्य व रौप्य पदक प्रदान करण्यात करुन खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या  स्मिता राजन काटवे, यांना मास्टर्स व्ही 2 महिला गटात सुवर्णपदक, साब्यासाची पानिग्रही ला 50 मीटर मोनोफिन मध्ये रौप्यपदक तर निया पतंगे, ज्युनिअर डी गर्ल, 50 मीटर सरफेस (मोनो फिन) कांस्यपदक मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.