पंतप्रधानांची नेमकी भूमिका काय? 

करोना लस वितरणाच्या मुद्द्यावरून राहूल गांधींनी साधला निशाणा

0

नवी दिल्ली ः देशात लस आल्यानंतर त्याचे वितरण कसे करायचे, याची तयार सरकारने सुरू केली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला लस दिली जाईल, असे सरकारने म्हंटलेलं असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालय असं का म्हणतेय की, केंद्राने असं कुठेही म्हंटलेलं नाही. या मुद्द्यावरून काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहूल गांधी यांनी ट्विट करून म्हटलेलं आहे की, ”बिहारच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मोफत लस दिली जाणार असे म्हंटलेलं होतं. आता केंद्रच म्हणतंय की, सर्वांना लस देणार, असं कधी म्हटलेलंच नव्हतं. पंतप्रधानांची नेमकी भूमिका काय आहे?”, असा प्रश्न राहूल गांधी यांनी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला.

केंद्रीय आरोग्य सचिव काय म्हणाले होते…

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषद केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले की, ”मी आधी स्पष्ट करतो की, देशभरात लसीकरण करण्यात येईल, असं सरकारनं कधीही म्हटलेलं नाही.” त्यानंतर भार्गवा म्हणाले की, ”आपला उद्देश करोनाची साखळी तोडण्यावर आहे. लसीकरण लसीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. जर आपण गंभीर लोकांचे लसीकरण करण्यास आणि विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर आपल्याला देशातील संपूर्ण लोकसंख्येला लस देण्याती गरज नाही.”

Leave A Reply

Your email address will not be published.