“मुख्यमंत्री वाढीव वीज बिलाचं काय झालं?”

मनसेने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरच बॅनर लावून विचारला प्रश्न

0

मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे सरकारवर वीज बिलांवरून थेट टीका केली आहे. मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांविरोधात ‘मातोश्री’ निवासास्थानासोर फ्लेक्स लावला आहे. त्यामध्ये ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे. तसेच वीज बिलाचं काय झालं, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

मातोश्रीसमोर लावलेल्या बॅरवर सरकारवर टीका करताना मनसेने म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता एक नवीन वर्ष आले, गोड बातमी तर दूर राहिली पण जनतेचे हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तर वीज बिल भरा उर्जामंत्री म्हणाले, मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले?”, अशा शब्दात टीका करत मुख्यमंत्री वाढीव वीज बिवाचं काय झालं?, असा थेट सवालही मनसेने उपस्थित केला आहे.
टाळेबंदीच्या काळात अनेक ग्राहकांनी वाढीव वीज बिले देण्यात आली. याबाबत वीज बिलांमध्ये सूट देण्याचं आश्वासनदेखील देण्यात आलं होत. मात्र, प्रत्यक्षात तशी सवलतच देण्यात आली नाही. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि आर्थिक अडचणी सहन कराव्या लागल्या, अशात वाढीव वीज बिलांबाबत सरकारने विचार करावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यावर सरकारने कोणता निर्णय घेतला नाही, म्हणून मनसेने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच बॅनर लावून थेट प्रश्न विचारला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.