मुंबई : “अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती? तुला आमदारकी दिली आहे पक्षाने, नेटाने काम कर. चांगला आवाज आहे बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील. यावर बोलून फार महत्त्व देण्याची गरज नाही” असं चित्रा वाघ यांनी सुनावलं आहे.
“वाघाची” डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती, पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळीसुद्धा हवेत कशी विरून जाते, हेही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते…” असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले होते.
“राजकारणात काय कुठल्याही क्षेत्रात महिलांसाठी रेड कार्पेट नाही, कधीही नव्हतं. मला राजकारणात जे जे काही समजलं, ते मी शिकले आणि मी त्यानुसार काम करते. 20 वर्ष मी राष्ट्रवादीत काम केलं. पहिल्या दिवसापासून मी सदस्य होते. मंत्रिपद कधी डोक्यात नव्हतं. मी माझं काम करत राहते. माझ्या मागे राजकारणाचा इतिहास-भूगोल नाही, मी सर्वसाधारण घरातील आहे. आमच्या घरात कोणी साधं ग्रामपंचायत सदस्यही नाही. माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत काम करणार” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
“आज मला पवार साहेबांची आठवण येते, साहेब मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून…. 5 जुलैला गुन्हा दाखल झाला, मला चांगलं आठवतंय आणि 7 जुलै… त्या दिवशी ईद होती.. 2017… मी साहेबांकडे गेले होते, सिल्व्हर ओकला बोलावलं होतं त्यांनी. माझा बापच आहे. त्यांनी बोलावून घेतलं मला, आणि मी एफआयआरची कॉपी त्यांना दिली, पंचनाम्याची कॉपी मी दिली. साहेबांनी सगळं वाचलं, म्हणाले चित्रा याच्यात तुझा नवरा कुठेच नाहीये. मी म्हटलं साहेब हेच आहे.” अशी आठवण चित्रा वाघ यांनी सांगितली होती.
नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेतही चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्याविषयी विश्वास व्यक्त केला होता. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले होते.
“वाघाची” डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती, पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळीसुद्धा हवेत कशी विरून जाते, हेही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते…” असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले होते.
“राजकारणात काय कुठल्याही क्षेत्रात महिलांसाठी रेड कार्पेट नाही, कधीही नव्हतं. मला राजकारणात जे जे काही समजलं, ते मी शिकले आणि मी त्यानुसार काम करते. 20 वर्ष मी राष्ट्रवादीत काम केलं. पहिल्या दिवसापासून मी सदस्य होते. मंत्रिपद कधी डोक्यात नव्हतं. मी माझं काम करत राहते. माझ्या मागे राजकारणाचा इतिहास-भूगोल नाही, मी सर्वसाधारण घरातील आहे. आमच्या घरात कोणी साधं ग्रामपंचायत सदस्यही नाही. माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत काम करणार” असं चित्रा वाघ म्हणाल्या. (Chitra Wagh Slams Amol Mitkari for question about Sharad Pawar)