मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक घेतली असून मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम बुधवारी (ता.4 मे) संपत आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकारण तापलं सुरुवात झाली असून मनसे कार्यकर्त्यांवर ठिक-ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत.
दरम्यान आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मनसैनिकांना 3 पाणी पत्र लिहलं असून हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं असून जिथे अजाण, बांग देतील त्या ठिकाणी भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी त्यांनाही कळू द्या भोंग्यांचा कसा त्रास होतो ते असं म्हटलं आहे.
दरम्यान आता राज ठाकरे यांच्या भूमिकेवर मनसैनिक काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.