लोकसभेत काम करताना सत्ता नसतानाही काम करता येत

निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी जागरुक असावा लागतो - शरद पवार

0

शिरुर : लोकसभेत गेल्यावर सत्ता आवश्यरच असते अस नाही सत्ता नसताना ही काम करता येत.  फक्त  आपण निवडून दिलेल्यालोकप्रतिनिधीचा हा जागरुक म्हणून लौकिक असावा लागतो, अस प्रतिपादन जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलं.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संसदरत्न खासदार डॉ. अमोलकोल्हे यांच्या प्रचारार्थ  शिरुर मध्ये जेष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा शिरूरच्या पाच कंदील चौकात पार पडली. यासभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, प्रवीण गायकवाड, अंकुश काकडे, आमदारअशोकबापू पवार, . रोहित पवार, उत्तमराव जानकर, नितेश कराळे, सुजताभाभी पवार, काकासाहेब पलांडे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे, देवदत्त निकम, सुरेश भोर आदी उपस्थित होते.

सत्तेत असल्याशिवाय विकास कामांसाठी निधी मिळत नाही, म्हणून सत्ता आवश्यक असते, अस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनसातत्याने सांगितलं जातं असताना. शरद पवारांनी जाहीर सभेत आज अजित पवारांचे हे विधान खोडून काढले. पवार म्हणाले की,

पुणे जिल्ह्यातून ग्रामीण भागातून दोन खासदार आहेत. ज्याच नाव देशातील लोकसभेत घेतलं जात. त्यातली एक माझी मुलगी सुप्रियासुळे आणि दुसरे डॉ अमोल कोल्हे. आज काही लोक सांगतात लोकसभेत जायचं. पण नुसतं जाऊन काय उपयोग,निधी आणावालागतो, त्यासाठी सत्ता असावी लागते.

आज मला विधानसभा लोकसभा राज्यसभा या तीन ठिकाणी जाऊन ५६ वर्ष झाली. हिंदूस्थानच्या लोकसभेत असा एक ही माणूस नाहीतो या ना त्या सभागृहात सलग ५६  वर्ष आहे. चांगल काम करणारा जागरूक सभासाद असेल तर निधी मिळतो ती जागरूकता डॉ. कोल्हे यांच्यामध्ये आहे.

पवार पुढे म्हणाले की, नुसत शेती एके शेती करून चालणार नाही. रांजणगावलाजी जमिन आहे ती जिरायत असताना मला अस्वस्थकरायची. नंतर तिथे येऊन बैठक घेतली एमआयडीसी केली. स्थानिक लोकांनी सहकार्य केल्यानंतर काय होत.याच उत्तम उदाहरणशिरूर रांजणगाव औद्योगिक वसाहत आहे.अनेक कामे होऊ शकली ती तुमच्या सहकार्यामुळे पाठींब्यामुळे, असेही पवार म्हणाले.

सरकार मध्ये या तालुक्याला कमी संधी दिली असं म्हटलं जातं..हे खरंय गेली अनेक वर्ष आंबेगाव ला वळसे पाटलांना मंत्री पद गेलंशिरूर ला कमी संधी मिळाली. हे मी मान्य करतो. पण आता एक गोष्ट चांगली झाली चार पैकी तीन जणांनी रस्ता बदलला. पण आताशिरूरला मंत्री पदाची संधी मिळेल अशोक पवारांच काम चांगलं त्यांना संधी मिळेल, असे सांगत शरद पवारांची अशोक पवारांबाबतमोठी घोषणा या सभेत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.