व्हाइट कॉलर ते सर्व गुन्हेगारांवर कारवाई करणार : अंकुश शिंदे
नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार
पिंपरी : नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज (गुरूवारी, दि.21) पदभार स्वीकारला. अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. बुधवारी उशीरा रात्री बदल्या झाल्या होत्या.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची व्ही. आय. पी सुरक्षा, विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मुबईत तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यापूर्वी विशेष महानिरीक्षक, सुधार सेवा मुंबई येथे सेवा बजावत होते. शिंदे यांची मुरब्बी ते प्रसिद्धी झोतापासून लांब राहणारे अधिकारी म्हणून ओळख आहे. गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी योग्य कारवाई करण्यास अंकुश शिंदे कुचराई करत नाहीत.
दरम्यान, नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधण्याचे टाळले. मात्र सोलापूर येथे असताना त्यांनी ‘व्हाईट कॉलर’गुन्हेगारांवर केलेल्या कारवाई बाबत विचारले असता इथेही सगळ्या प्रकारच्या कारवाया केल्या जातील. अगोदर मला संपूर्ण माहिती घेऊ द्या, असे त्यांनी सांगितले.