स्फोटके असलेल्या ‘त्या’ स्कॉर्पिओचा सूत्रधार नक्की कोण ?

0

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची रविवारी दिवसा मिळालेली माहिती खोटी असल्याचे त्या संघटनेने रात्री स्पष्ट केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला. त्यामुळे या स्फोटामागे नक्की कोण आहे, याचा संभ्रम कायम आहे.

याआधी दिल्लीतील दूतावासाबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणातही असा दावा केला होता. मात्र तपासात तसा पुरावा हाती लागला नाही. मुंबईतील स्फोटकांप्रकरणी अद्याप दहशतवादी संघटनेचा संबंध समोर आलेला नाही.

लढा संघ-भाजपशी आमचा लढा धर्मनिरपेक्ष लोकशाही, रा. स्व. संघ, भाजपच्या विचारधारेशी आहे. मोदींच्या मुस्लिमविरोधी भूमिकेशी आहे. उद्योगपतींशी नाही, असे सांगत या संघटनेने या स्फोटकांशी असलेला संबंध नाकारला. टेलिग्रामवरील पोस्टबाबत त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणांनाच जबाबदार धरले.

जैश-उल-हिंदच्या नावे टेलिग्रामवरील संदेशात ‘मुकेश अंबानीयांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सोडणारा सुरक्षित ठिकाणी पोहोचला आहे. हा फक्त एक ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे’, असे म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.