मुंबई : स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी ही सचिन वाझे यांच्या सहकाऱ्यांनी तिथे सोडली होती, तसेच ती इनोव्हा सचिन वाझे स्वतःच चालवत होते; अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे.
25 फेब्रुवारी रोजी कार मायकल रोडवर जिलेटीन स्फोटकांनी कार सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा कार आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझेच चालवत होते, अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. तसंच, हिरवी स्कॉर्पिओ आणि पांढरी गाडी चालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून CIU चे पोलीस होते.
स्कॉर्पिओ गाडी उभी करून पांढऱ्या गाडीतून सचिन वाझे आणि आणखी दोन CIU चे अधिकारी बसून मुलूंड टोल नाक्यावरुन ठाण्याला गेले होते.नहिरवी आणि पांढऱ्या रंगाची इनोव्हा आणि स्कॉर्पिओ गाडी ठाणे येथेच पार्क केली होती, अशी माहितीही समोर आली आहे.