उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषण करण्यापासून कोणी रोखलं?

पंतप्रधान यांनी विनंती करुनही अजित पवार उठले नाहीत भाषणाला

0

देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देहुतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर माळवाडीत राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या वारकऱ्यांची संवाद सभा घेण्यात आले. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देहू संस्थानाचे नितीन महाराज मोरे यांच्यासह अन्य विश्वस्त उपस्थित होते.

या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होईल असे वाटत होते. पण सुत्रसंचालकाने थेट नरेंद्र मोदींना भाषणासाठी आमंत्रित केले. याप्रसंगी स्वत: नरेंद्र मोदींनी अजित पवारांना बोलण्यासाठी आग्रह केला. मोदींनी अजित पवार तुम्ही बोेला असं म्हणाले. तरीही अजितदादांनी भाषण करायला नकार दिला. त्यामुळे आता अजित पवारांना भाषण का करु दिले नाही, याबाबत वारक-यामध्ये चर्चा रंगली आहे.

भाषणादरम्यान नरेंद्र मोदी संत तुकारामांचे अभंग म्हणाले. यावेळी त्यांनी पालखी मार्गाचा आवार्जून उल्लेख केला. काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गावरील दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदीकरणाचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली. पालखी मार्गाचे काम पाच टप्प्यात पुर्ण होईल. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण होईल.

या प्रकल्पातील एकूण मार्गाची लांबी ३५० किलोमीटर असेल. त्यासाठी ११ हजार कोटी रुपयांचा खर्च होईल असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. देशात सरकारी योजनेचा लाभ सर्वांना सारखा मिळत आहे, त्यात कसलाही भेदभाव केला जात नाही असेही मोदी यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.