पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना प्राधीकरणातील योजना या सर्व योजनाची सोडत व कामपूर्ण झाले नाही तरीपण सोडत काढली जाते. पंतप्रधान आवास योजनेतबा बो-हाडेवाडी, च-होली, रावेत येथील 3664 सदनिकांचे काम 10% देखील पूर्ण झाले नाही तरी देखील 26-02-2021 रोजी या योजनेतील घरांची सोडत केली आहे. मग भाटनगर येथील 672 सदनिका पूर्णपणे बांधून तयार आहेत. त्यामधील लाभार्थ्यांनी प्रत्येकी स्वहिस्सा 50,000/- रू. भरला आहे. त्याचे बायोमॅट्रीक देखील झाले आहे.
त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन विभागामार्फत २३/०३/२०२१ सदनिका सोडतीचा दिनांक व वेळ ठरविला होता, परंतु भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांनी या सोडतिला कोरोनाचे कारण दाखवून ख-या अर्थाने विरोध दर्शविला आहे व पाचही बिल्डिंगचे दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यावर सदनिका सोडत करावी असे सांगितले. यामुळे पुन्हा एकदा या प्रकल्पामधील 672 सदनिका धारकांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक भागांमध्ये पुनर्वसन प्रकल्प राबवले जातात व काम अपूर्ण अवस्थेत असले तरीही त्या प्रकल्पाचे सोडत काढली जाते? मग पत्राशेड लिंकरोड पुनर्वसन प्रकल्पाचे १००% काम पूर्ण होवून सदनिका धारकांनी स्वहिस्सा प्रत्येकी ५०,०००/- भरून व पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत बायोमॅट्रीक करून देखील या प्रकल्पाची सोडत का काढली जात नाही याच सोडतिला भारतीय जनता पक्षाचा विरोध का ?
या प्रकल्पाकडे लक्ष देवून या प्रकल्पातील सदनिका धारकांच्या सदनिकांची सोडत करावी अन्यथा 672 सदनिका धारकांना त्याच्या न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड च्या वतीने आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.