मुंबई ः बाॅलिवुडची प्रसिद्ध आणि वादग्रस्त अभिनेत्री कंगणा राणौत नेहमी बातम्यांच्या वर्तुळात फिरत असते. लोक माझा का तिरस्कार करतात, माझ्या विरोधात लोक का असतात आणि लोक मला सतत का ट्रोल करत राहतात, याविषयी कंगणाने ट्विटच्या माझ्या माध्यमातून सांगितले आहे.
लोक माझा तिरस्कार का करतात यासंबंधी कंगणाने ट्विट करत सांगितले आहे की, ”मी फिल्म इडंस्ट्रीमध्ये प्रामाणिकपणे काम केले आहे, त्यामुळे लोक माझ्या विरोधात असतात. मी आरक्षणाला विरोध केला तेव्हा हिंदू माझा तिरस्कार करू लागले. मणिकर्णिका सिनेमा रिलीज करत असताना करणी सेनाविरोधात मी लढाई केली, तर राजपुतांनी मला धमकी दिली. मी इस्लामी कट्टरपंथीयांच्या विरोधात उभी राहिले तर मुस्लीम माझ्या विरोधात उभे राहिले. मी खलिस्तानीसंबंध बोलले तर शिख माझ्या विरोधात उभे राहिले”, असे कंगणाने ट्विटरवरून स्पष्टीकरण दिले आहे.
कंगणाने पुढे म्हणते की, ”माझे शुभचिंतक मला सांगतात… माझ्यासारख्या मतदार कोणत्याही राजकीय पक्षाला आवडत नाही. त्यामुळे स्पष्टपणे कोणताही राजकीय पक्ष माझी बाजू घेत नाही. तुमच्यासारखे लोक माझ्याबद्दल विचार करतात की, मी हे सर्व कशासाठी करते? तसंही पाहिलं या जगापलिकडे माझे कौतुकदेखील करणारे खूप आहेत”, असे मत कंगणाने आपल्या सोशल मीडियावरून सांगितले जात आहे.