मुख्यमंत्री स्वतःची पाठ का थोपटून घेताहेत ः फडणवीस
उद्याच्या अधिवेशनात विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार
मुंबई ः ”करोना काळात महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे. करोनाची लाट थोपविण्यात आपण यशस्वी झालो, असे उद्धव ठाकरे म्हणाहेत. मात्र, करोनाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही महाराष्ट्रातच जास्त आहेत. तसेच बाधितांचा आकडाही जास्त आहे. अशात मुख्यमंत्री स्वतःची पाठ का थोपटून घेताहेत, हे समजत नाही”,अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले की, ”मराठा आरक्षणला स्थगिती मिळाली, हे सरकारच्या अयोग्य भूमिकेमुळेच. अधिवेशनही अवघ्या सात तासांच घेतलं जात आहे. आम्ही जनतेचे प्रश्न मांडायचे कसे”, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
”वीज बिलांबाबत घूमजाव केलं. कोल्हापुरात वाहून गेलेल्या एका घरालाही अडीच हजारांचं बिल पाठविण्यात आलं, या सर्व प्रश्नाबाबत सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत. मेट्रो कारशेड फक्त अंहकारातून कांजूरमार्गला हलवलं,. फक्त राजकीय आकसापोटी सुरू असलेल्या योजना सरकार बंद करत आहे. अधिवेशाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर आम्ही बंदी घालतो आहोत”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.